एरंडोल विविध कार्यकारी सोसायटी चे एटीएम उद्घाटन..

0


एरंडोल( कुंदन ठाकुर)

विविध कार्यकारी सोसायटी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले विकास सोसायटी तर्फे एटीएम चे उद्घाटन बँकेचे कार्यकारी संचालक व व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजप नेते अँड. किशोर काळकर उपस्थित होते
विकास सोसायटीच्या कार्यालया त विजया दशमीचे मुहूर्त साधून एटीएम चे उद्घाटन कार्यकारी संचालक व व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा चे जनजातीय समितीचे प्रदेशाध्यक्ष अँड. किशोर काळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सोसायटीचे चेअरमन विजय पंढरीनाथ महाजन होते. यावेळी संस्थेचे चेअरमन विजय महाजन यांनी या संस्थेच्या व्यापारी संकुल व सुविधा जनक वास्तूचे भूमिपूजन दिवाळीत होणार असल्याचे जाहीर केले

तसेच संस्था हे भविष्यात पेट्रोल पंप व्यापारी संकुल शेतमाल तारण कर्ज अशा विविध योजना राबवणार असल्याचे जाहीर केले अँड. किशोर काळकर सोसायटीच्या चेअरमन व संचालकांचे कार्याचे कौतुक केले जिल्ह्यात एकमेव संस्था अशी आहे ज्याचे स्वतःचे एटीएम आज सुरू होत आहे तसेच नवीन योजनांचे स्वागत केले. बँक संघटनेचे सोसायटीचे अध्यक्ष सुनील पवार जिल्हा बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख सदर सोसायटीत एक मत दिसत असून येथील संचालक हे जागृत असल्याचे उदाहरण दिले त्यांच्या पुढील कार्यास जिल्हा बँकेचे पूर्ण सहकार्य मिळेल तसेच संस्थेचे चेअरमन विजय महाजन त भावी कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या यांनी आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जावेद मुजावर यांनी केले प्रस्तावना चेअरमन विजय महाजन या तर आभार प्रदर्शन माजी चेअरमन दुर्गादास महाजन यांनी मानले
सदर कार्यक्रमाला राजेंद्र पाटील संचालक ,रवींद्र महाजन, रमेश महाजन ,राजेंद्र चौधरी, पंडित पाटील, ईश्वर पाटील ,युवराज महाजन, राजधर उर्फ आबा महाजन महाजन ,इच्छाराम महाजन, शांताराम महाजन सुरेश देशमुख डब्ल्यू डी धनगर नितीन महाजन एजाज अहमद शेख सुमनताई महाजन निर्मलाताई महाजन ज्ञानेश्वर पाटील रघुनाथ ठाकूर हे संचालक उपस्थित बँकेचे सेक्रेटरी बापू महाजन शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी संस्थेचे कर्मचारी युवराज महाजन भगवान महाजन निंबा महाजन मन्साराम महाजन,जोशी आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!