दोधवद येथील लोकनियुक्त सरपंच सह संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध.. तर पिंपळे खुर्द येथेही सरपंच सह सहा सदस्य बिनविरोध झाले आहेत. तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींत एकूण ४६ सदस्य बिनविरोध..

अमळनेर /प्रतिनिधि


तालुक्यातील दोधवद येथील लोकनियुक्त सरपंच सह संपूर्ण ग्रामपंचायत बिनविरोध झाली. तर पिंपळे खुर्द येथेही सरपंच सह सहा सदस्य बिनविरोध झाले आहेत. तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींत एकूण ४६ सदस्य बिनविरोध झाले आहेत.
तालुक्यातील दोधवद येथे सरपंचपदी कमलबाई सैंदाणे तर सदस्यपदी दिनेश भिल , वैजनताबाई भोई , भुराबाई भिल ,संगीताबाई राजपूत ,प्रवीण ठाकरे , सरला कोळी हे बिनविरोध निवडून आले आहेत. तर पिंपळे खुर्द येथे सरपंच वर्षाबाई युवराज पाटील तर सदस्य पदी लोटन भिल ,संतोष चौधरी , शोभाबाई गोकुळ पाटील ,शिलाबाई पाटील ,अरुण पाटील बिनविरोध झाले आहेत.
ग्रामपंचायत प्रमाणे बिनविरोध सदस्य पुढील प्रमाणे ढेकू सिम – नामदेव पाटील ,सुरेखा भिल , समाधान गायकवाड , गोवर्धन – ललिता भिल ,सरोज शिंदे , शिरसाळे – वंदनाबाई शिरसाठ , प्रवीण महाले,भटू चौधरी, मंगरूळ- कावेरी निरंक पाटील , लोंढवे- दिलीप पाटील , भरवस- आशाबाई मांग , छोटाबाई मुसे , संजय सोनवणे , मंगेश पाटील ,कविता पाटील ,श्यामराव पाटील , ज्योती पाटील ,सुनीता वानखेडे , अमळगाव -नाजूका पारधी , नंदगाव – सरूबाई पाटील ,समाधान बिऱ्हाडे , सडावण – रेखाबाई पाटील ,नीलम पाटील , रढावन- तुकाराम सोनवणे , दीपाली अहिरे ,रेखा पाटील , मठगव्हाण- कमल बेली , सीमा शिरसाठ , दीपक शिरसाठ ,पूनम शिरसाठ ,रवींद्र पाटील , रेखा भिल हे सदस्य बिनविरोध झाले आहेत. १२ सरपंच पदासाठी ३३ उमेदवार रिंगणात आहेत. तर एकूण ८३ सदस्यांसाठी २१६ उमेदवार रिंगणात आहेत.