मुस्लिम सोशल ग्रुपतर्फे भाविकांना सोनगीरच्या रथयात्रेत थंड पाणी.

धुळे/अनीस खाटीक

धुळे,सोनगीर येथील रथयात्रेत मुस्लिम सोशल ग्रुपतर्फे जातीय सलोखा व राष्ट्रीय एकात्मता अबाधित राहावी यासाठी भाविकांना पिण्याच्या थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. पाणपोईचे उद्घाटन पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद भाई जागीरदार यांनी भूषविले येथील मनीयार मशिदीजवळ कार्यक्रम झाला. यावेळी विभागीय पोलिस अधिकारी साजन सोनवणे,सपोनि सचिन कापडणीस, माजी पंचायत समिती सदस्य अविनाश महाजन, धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी सुरेश अहिरे माजी सरपंच सत्तार खान पठाण, दंगल वामन धनगर राजेंद्र झेंडू महाजन ग्राम पंचायत सदस्य पिंटू भाऊ सैंदाणे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद धनगर भटू माळी बापू पाटील रविराज माळी शरद पाचपुते सदानंद जैन संजय परदेशी प्रकाश परदेशी युसुफ खान पठाण फंखरोद्दीन शेख नसीर खा पठाण इब्राहिम शेख साबीर कुरेशी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम सोशल ग्रुपचे आरिफ एस पठाण शफीयोद्दीन पठाण अशरफ खा पठाण मुन्ना शेख आरिफ पठाण जमील शेख अनिस कुरेशी हाजी इकबाल कुरेशी इरफान कुरेशी हाजी अल्ताफ कुरेशी नाजीम बेग मिर्झा यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रस्ताविक व आभार आरिफ खान पठाण यांनी मांडले.