ज्येष्ठ कीर्तनकार बाबा |महाराज सातारकर यांचे निधन..

24 प्राईम न्यूज 27 Oct 2023.

संत परंपरा आपल्या कीर्तनातून जपण्याबरोबरच जीवन सुखी आणि आनंदी जगण्याचे मर्म समाजापुढे मांडून प्रबोधनाचे महानीय कार्य करणारे ज्येष्ठ कीर्तनकार निळकंठ ज्ञानेश्वर गोरे ऊर्फ बाबा महाराज सातारकर यांचे गुरुवार २६ ऑक्टोबर रोजी वयाच्या ८९ व्या वर्षी नेरूळ येथील निवासस्थानी निधन झाले. आठ महिन्यांपूर्वीच सातारकर यांच्या पत्नी रुक्मिणी सातारकर ऊर्फ माई सातारकर यांचे निधन झाले आहे. त्यानंतर आता त्यांचे निधन झाल्याने सातारकर परिवार व वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.