मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दिल्लीने पायपुसणे केले आहे. -खासदार संजय राऊत

24 प्राईम न्यूज 27 Oct 2023

राऊत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार दिल्लीला जात आहेत. महाराष्ट्राचा दिल्लीत एक वेगळा रुबाब होता. आता राज्यातील या सरकारला एकप्रकारे दिल्लीतील पायपुसणेच केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच दिल्ली आणि आग्राला गेले आणि सर्व खानांना धडा शिकवून आले होते, पण आता चहा पिऊ का? पाणी पिऊ का हे विचारण्यासाठी तुम्हाला वारंवार दिल्लीत जावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे. एकनाथ शिंदे म्हणतात की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारा मुख्यमंत्री आहे. बाळासाहेबांचा स्वाभिमानी शिवसैनिक आहे, असे बोलणाऱ्या मुख्यमंत्री शिंदे यांचे दिल्लीने पायपुसणे केले आहे, असेही राऊत म्हणाले.