घोसला ग्रामपंचायतीच्या दोन महिला सदस्यांनी दिले राजीनामे; सोयगाव तालुक्यातील पहिली ग्रामपंचायत..

सोयगाव/साईदास पवार

सोयगाव, दि.२७..राजीनामे मंजूर करत नसाल तर थेट ग्रामपंचायत च्या दरवाजावर चिटकवून दिले आहे असे म्हणत सोयगाव तालुक्यातील घोसला ग्रामपंचायत च्या सुवर्णा ज्ञानेश्वर वाघ व पावित्राबाई युवरे यांनी सदस्यत्व पदांचे राजीनामे शुक्रवारी ग्रामपंचायतीच्या दरवाजा वर चिटकविले आहे तर निमखेडी गावात शुक्रवार (दि.२७) पहाटे सात वाजेपासून च राजकिय नेत्यांना गांवबंदी चे फलक झळकू लागली आहे..त्यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे
मराठा आरक्षणाचा प्रश्नावर शासनाने कोणताही निर्णय दिला नाही मग शासनाच्या प्रक्रियेतच राहायचे नाही अशी प्रतिक्रिया सदस्य सुवर्णा वाघ यांनी दिली आहे घोसला ग्रामपंचायत नऊ सदस्यांची आहे त्यामुळे ही राजीनामे मंजूर झाल्यास घोसला ग्रामपंचायत अल्पमतात येण्याची शक्यता असून मराठा आरक्षणाचा या ग्रामपंचायत ला फटका बसणार आहे शुक्रवारी पहाटे व गुरुवारी रात्री या दोन्ही सदस्यांनी पदांचे राजीनामे दरवाजा वर डकवून दिले आहे…..
—–आरक्षण साठी आंदोलन करणार
दरम्यान शासन प्रक्रियेतुन बाहेर पडून सकल मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून तालुका भर आंदोलन करण्याची तयारी या दोन्ही महिलांनी दर्शवली आहे….त्यामुळे आता तालुक्यातील महिलांना सोबत घेऊन मराठा आरक्षणासाठी महिलाही शुक्रवारपासून पुढे येत आहे….