जळगांव लोकसभेसाठी काँग्रेसला सोडा – तालुका काँग्रेस कमिटीचा ठराव..

अमळनेर/प्रतिनिधि

जळगांव लोकसभेसाठी काँग्रेसला सोडा अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीने केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत जळगांव लोकसभा मतदार संघाची जागा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीला सोडण्यात यावी व जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करणारा ठराव अमळनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीने बैठकीत ठराव क्र. ३ अन्वये एकमुखाने पारीत करण्यात आला आहे. सदर बैठकीत काँग्रेस तालुका अध्यक्ष गोकुळ बोरसे व शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी प्रस्ताव मांडला त्यात सुचक म्हणुन त्र्यंबक पाटील, बी.के. सुर्यवंशी, धनगर दला पाटील, के.डी. पाटील, डी.डी. पाटील, सुलोचना वाघ, अलिम मुजावर आदी सर्व पदाधिकारी यांनी एकमुखाने अनुमोदन देऊन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस
कमिटी प्रांताध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे मागणी करावी असा सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे.