आंतरवली सराटी येथे मराठा आरक्षण मागणीसाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे यांच्या आंदोलनास आमदार फारूख शाह यांचा जाहिर पाठींबा..

धुळे/अनिस खाटीक

उपरोक्त विषयान्वये निवेदित करण्यात येते की, मराठा आरक्षण मागणीसाठी मनोज जरांगे दुसऱ्यांदा आंतरवाली सराटी ता.अंबड जि.जालना येथे आंदोलन करित आहेत. मनोज जरांगे यांनी आरंभलेल्या आंदोलनास महाराष्ट्रातील प्रत्त्येक जिल्ह्यात चालेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देण्यात येत आहे.
भारतीय जातीग्रस्त समाजात शोषणाचामुख्य स्रोत जात राहिली आहे. त्यामुळे निम्न

जातीयांना योग्य पात्रता असतानांही प्रत्त्येक ठिकाणी संधी नाकारण्याचे काम जातिव्यवस्थेने केलेले आहे.मुठभर उच्चजातीयांच्या हाती सत्ता-मत्ता-आणि अधिकार (Power) केंद्रित झाल्याचे गेल्या अनेक दिवसांपासून दिसत आहे. त्यामुळे प्रत्येकवेळी काहीतरी कारण देवून मराठा, धनगर मुस्लिम आरक्षणाला वाटण्याचा अक्षदा दाखविण्यात आलेल्या आहेत.यासाठी संपूर्ण देशभरात जातीनिहाय जातगणना करून आरक्षणाच्या मुद्याचा कायम स्वरूपी तोडगा काढता येवू शकतो.
महाविकास आघाडीचे सरकार असतांना आमचे सरकार येवू द्या फक्त दोन महिन्यात मराठा आरक्षण देतो असे म्हणणारे भाजपाचे नेते सत्ता हातात येवून सव्वा वर्ष झाले तरी मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवू शकले नाही.हे अपयश झाकण्यासाठी आंदोलन चिरडण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न यापूर्वी सरकारने केला होता. भाजपाचे सत्ताधारी कायमच मराठा आरक्षणाबद्द्ल मराठा समाजाला गाजर दाखवत आलेले आहे. आणि याचा जाब विचारल्यावर लाठीचार्ज आणि आंदोलकांवर गंभीर गुन्हे दाखल केले जातात. यापूर्वी सुमारे पाच वर्षांपुर्वी नवी मुंबईतील कामोठे येथे मराठा मोर्चा आंदोलकांवर कलम ३०७ सारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले होते.त्यावेळी देखील राज्याचे गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीस होते.आणि आता देखील राज्याचे गृहमंत्री ना.देवेंद्र फडणवीसच आहेत.यानिमित्तानेआंदोलक मराठा तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल करायचे आणि त्यांना जीवनातून उठवायचे हि संघ-भाजपाची कुटील नीती समोर आलेली आहे.
आंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानूष लाठी हल्य्याचा जाहीर निषेध धुळे जिल्हा AMIM पक्षाने दि.३ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी धुळे कार्यालयासमोर आंदोलन करून केला होता आणि मराठा आरक्षणाच्या मागणीला पाठींबा देला होता.
१) ओबीसी आरक्षण अबाधित ठेवून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.
२) जातीनिहाय जनगणना करण्यात यावी.
३) धनगर-मुस्लिम यांना देखील आरक्षण देण्यात यावे.
या मागण्या कायम ठेवून आपल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत आहे. आपला फारुख अन्वर शाह
आमदार धुळे शहर..