मुद्रांक विक्रेत्यांचा 30 रोजी बंद. -जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार..

अमळनेर /प्रतिनिधि

मुद्रांक विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी ३० ऑक्टोबर रोजी बंद पुकारला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे. १०० व ५०० रुपयांचे मुद्रांक विक्री बंद करू नये, कमिशन तीन टक्केवरून दहा टक्के करण्यात यावे, मुद्रांक विक्रेत्यांच्या वारसांना परवाने मिळावेत, मुद्रांक विक्री मर्यादा दहा हजारावरून एक लाख करण्यात यावी, फ्रांकिंगदेखील मुद्रांक विक्रेत्यांकडून करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी अमळनेर तालुक्यातील मुद्रांक विक्रेत्यांनी 30 रोजी बंद पुकारल्याची माहिती तालुकाध्यक्ष दत्ता संदानशिव यांनी दिली. तालुक्यात मुद्रांक संबंधित सर्व व्यवहार बंद असतील, असे कळवण्यात आले आहे.