मराठा आरक्षणासाठी आजपासून गावागावात आंदोलन – मनोज जरांगे

24 प्राईम न्यूज 29 Oct 2023

मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे – पाटील यांनी रविवारी, २९ ऑक्टोबरपासून राज्यातील गावागावांमध्ये उपोषण सुरू करण्याचे आवाहन शनिवारी केले. जरांगे यांच्या उपोषणाचा शनिवारी चौथा दिवस होता. त्यांनी रविवारपासून आंदोलनाचा लढा आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला, तर आंदोलनाचा यापुढचा टप्पा मंगळवारी ३१ ऑक्टोबरला स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, नेत्यांना गावबंदी कायम असल्याने राज्यात शनिवारी ठिकठिकाणी अनेक ठिकाणी संघर्ष उद्भवल्याचे पहायला मिळाले.