अजित पवारांचा आजचा बारामतीचा दौरा रद्द. आक्रमक पावित्रा मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आला..

24 प्राईम न्यूज 29 Oct2023

अजित पवारांचा आजचा बारामतीचा दौरा रद्द अजित पवारांच्या दौऱ्याला मराठा क्रांती मोर्चाकडून विरोध करण्यात आला. माळेगाव कारखान्यापर्यंत अजित पवारांना जाऊ दिलं जाणार नाही, असा आक्रमक पावित्रा मराठा क्रांती मोर्चाकडून घेण्यात आलेला.
मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीही करण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तणावाचं वा- तावरण निर्माण झालं आहे. अजित पवारांच्या विरोधातदेखीलबारामतीत घोषणाबाजी केली जात आहे. राजकीय पुढाऱ्यांसह नेत्यांना बारामती तालुक्यात फिरकू देणार नाही, अशी भूमिका मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
अजित पवारांनी बारामतीत येऊ नये, असं पत्र बारामतीतील कार्यकर्त्यांनी माळेगाव पो- लीस ठाण्यात दिलं होतं. त्यानंतर पोलीस आणि मराठा कार्यकर्त्यांनी बैठक झाली ही बैठक निष्फळ ठरली. अजित पवारांना कोणत्याही परिस्थितील माळेगाव साखर कारखान्याच्या मोळी पुजनाला येऊ देणार नाही या भूमिकेवर मराठा कार्यकर्ते ठाम होते.