अंतुर्ली येथील युवकाची आत्महत्या..

अमळनेर /प्रतिनिधि.

तालुक्यातील अंतुर्ली येथील एका २३ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (ता.२८) सकाळी सहाच्या सुमारास घडली. अमळनेर तालुक्यातील अंतुर्ली येथील जयेश शरद पाटील (वय २३) या तरुणाने त्याच्या स्वतःच्या शेताच्या बांधावर चिंचेच्या झाडाला नायलॉनच्या दोरीने गळफास आत्महत्या केल्याचे आढळून आल्याने आनंदा पाटील यांनी मारवड पोलिस ठाण्याला खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पोलिस कर्मचारी सुनील आगोने तपास करीत आहेत.