माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल; मनोज जरांगेचा इशारा..

0

24 प्राईम न्यूज 30 Oct 2023

राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आरक्षणाच्या मागणीवरून राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा आरक्षणासाठी जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत.

रविवारी उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांनी सरकारला चर्चेसाठी दारं खुली केली आहेत. दोन दिवस मी बोलू शकतो, त्यामुळे दोन दिवसात काय बोलायचे ते बोला. माझे हृदय बंद पडले तर सरकारचे हृदय बंद पडलेच म्हणून समजा, असे म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या दरम्यान, माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारला आरक्षण द्यायचे नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागेल. कुणाचातरी जीव : धोक्यात गेल्याशिवाय समाजाचे कल्याण होणार नाही. मला काही होणार नाही. आंदोलन थांबणार नाही. माझ्या हृदयावर आणि किडनीवर परिणाम होईल, असे डॉक्टर म्हणत असले तरी होऊ द्यायचा नसेल तर सरकारने ताबडतोब आरक्षण द्यागे. माझे हृदय बंद पडले तर सरकारचे हृदय बंद पडलेच म्हणून समजा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!