मराठा आरक्षणाचा निर्णय तातडीने घ्या !
शरद पवार यांचे केंद्र-राज्य सरकारला आवाहन..

24 प्राईम न्यूज 30 Oct 2023

केंद्र आणि राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवा. कुणाच्याही ताटातलं न काढतामराठ्यांना आरक्षण दिले पाहिजे. आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा. तसेच मनोज जरांगे पाटलांची प्रकृती व्यवस्थित राहावी आणि महाराष्ट्रातली ही परिस्थिती लवकरात लवकर नीट व्हावी, अशी अपेक्षा राष्ट्रवादीकाँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली. आणि त्याचा परिणाम आपण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वनव्याच्या स्वरूपात पाहत आहोत असेही ते म्हणाले. दरम्यान, आरक्षणाच्या मुददयावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनी राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.