जी.एस.हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची मोफत रक्तगट तपासणी नर्मदा फाउंडेशन व डॉ.अनिल शिंदे यांचा उपक्रम..

अमळनेर/प्रतिनिधि

येथील खानदेश शिक्षण मंडळ संचलित जी.एस.हायस्कूल येथे विदयार्थ्यासाठी मोफत रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.नर्मदा फाउंडेशन व डॉ.अनिल शिंदे यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात आली.
यावेळी व्यासपीठावर खा.शि.मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ.अनिल शिंदे,संचालक सी.ए.नीरज अग्रवाल,शाळेचे चेअरमन हरी भिका वाणी,मुख्याध्यापक बी.एस.पाटील,पर्यवेक्षक एस.बी.निकम,शिक्षक प्रतिनिधी ए.डी.भदाणे,जेष्ठ शिक्षक एस.आर.शिंगाने उपस्थित होते.
यावेळी डॉ.अनिल शिंदे,रक्तदान चळवळीचे सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाने,उदयकुमार खैरनार यांनी विद्यार्थ्यांना रक्तगटाचे विविध प्रकार,रक्तगट माहीत असल्याचे फायदे,रक्तदानाचे फायदे या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.
यावेळी नर्मदा फाउंडेशन चे कर्मचारी मनोज सूर्यवंशी,योगेश पाटील,ललिता पाटील यांनी विद्यार्थ्यांचे रक्तगट तपासणी केली.शाळेतील २००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची रक्तगट तपासणी करण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापक बी.एस.पाटील यांनी सांगितले.