मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला; आमदार प्रकाश सोळंके यांचं घर पेटवलं, बीड जिल्ह्यात तणाव..

24 प्राईम न्यूज 30 Oct 2023

माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या घरावर दगडफेक करुन वाहनांची जाळपोळ करण्यात आली. मराठा आरक्षण आंदोलन आता चिघळले असल्याचे दिसून येत आहे आज माजलगाव येथे मराठा आरक्षण Maratha reservation आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले. आमदार प्रकाश सोळंके Prakash Solanke यांच्या सादोळा रस्त्यावर असलेल्या बंगल्यावर जमावाने दगडफेक केली. बंगल्याचे गेट तोडून शेकडो तरुण आत घुसले व आमदार सोळंके यांच्या सर्व वाहनांना आग लावली. या घटनेनंतर पोलिस घटनास्थळी दाखल झालेत. गेल्या काही दिवसांपासून आमदार सोळंके Prakash Solanke यांच्या काही अॉडिओ क्लीप व्हायरल होत असून यात आमदार सोळंके यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर राजीनामा द्यावा असे म्हटलं आहे. मराठा आरक्षण प्रश्न दिवसेंदिवस आक्रमक होत असल्याचे दिसत आहे.