बँ. वि.दा.सावरकर स्मारक परिसर सुशोभीकरणाचे काम मनपा सत्ताधाऱ्यांच्या अडेलतट्टूपणामुळे मागे राहिले… -डॉ. दिपश्री नाईक
बँ. वि.दा.सावरकर स्मारक परिसर सुशोभीकरणाचे काम तातडीने मार्गी लावा.. डॉ. दिपश्री नाईक.


धुळे/अनिस खाटीक. देवपूर येथील बँ. विनायक दामोदर सावरकर यांचा पुतळा परिसर सुशोभिकरण कामासाठी आ.फारुख शाह यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून २०लक्ष मात्रची रक्कम दिलेली आहे. त्यानुसार धुळे महानगरपालिका धुळे यांना अंदाजपत्रकासह सविस्तर प्रस्ताव सादर करणेस मा.जिल्हाधिकारी धुळे यांनी कळविले आहे. मा.जिल्हाधिकारी धुळे यांनी दि.२९/०५/२०२३ रोजी पत्रानुसार प्रस्ताव सादर करणे अपेक्षित होते, मात्र अद्यापपर्यंत सदर प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. मनपा सत्ताधारी-यांच्या दबावाखाली सदर काम थांबविण्यात आल्याचे निदर्शनास येते.त्यामुळे सदर बँ. विनायक दामोदर सावरकर यांचे स्मारक परिसर सुशोभिकरण करण्याच्या प्रस्तावास तत्काळ मंजुरी देवून म.जिल्हाधिकारी यांच्या कडे प्रशासकीय मंजुरीसाठी सादर करण्यात यावा, अशी मागणी एमआयएम पक्ष महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. दिपश्री नाईक,नगरसेविका नाजीया पठाण,नगरसेविका हीना पठाण, ऍड. प्रिती त्रिवेदी,रेखा कुळकर्णी,भाग्यश्री बैसाने,भारती येवले, यांनी आयुक्त यांना निवेदन देवून केली आहे.