जि.प.शाळा नं.१व २ मालपूर ता.शिंदखेडा येथे जिल्हा सत्र न्यायालय,धुळे येथील न्यायाधीश डाॅ.ख्वाॅजा साहेब यांच्या पथकाची भेट..

मालपुर प्रतिनिधी /प्रभाकर आडगाळे.

आज दिनांक 28.10.2023 शनिवार रोजी,सर्वोच्च न्यायालय औरंगाबाद (खंडपीठ) यांचे आदेशानुसार जिल्हा न्यायालय,धुळे येथील जिल्हा न्यायाधीस मा.डाॅ.एफ.ए.एम ख्वाॅजा साहेब, प्रबंधक मा.विकास पुराणिक साहेब, शिपाई मा.पाटील यांच्या पथकाने
जि.प.शाळा नं.1व 2 मालपूर या शाळेची भौतिक सुविधा व संरक्षक बाबत चौकशी केली.गावातील काही लोकांकडून शिक्षक व विद्यार्थी यांना उपद्रव होत असेल,तसेच शालेय परिसरात अवैध धंदे चालत असतील त्याबाबत तक्रार द्यावी.त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. संबधित पथकाने मार्गदर्शन केले.
यावेळी मालपूर गावाचे पोलीस पाटील श्री.बापू बळीराम बागुल जि.प.शाळांचे मुख्याध्यापक श्री.राजेंद्र चोधरी श्री.जितेंद्र पाटील
पत्रकार गोपाल कोळी सुरेश चित्ते शिक्षक संजय बैसाणे,रघुनाथ चव्हाण,चंचल नागरे उपस्थित होते.