मराठा आरक्षणासाठी श्री. जरांगे-पाटीलांनी गांभिर्यशून्य सरकारला एक तास सुध्दा देवू नये..

0

शिंदे, फडणवीस, पवार सरकार म्हणजे ‘कोंबडा आरवतो खूप पण अंड देत नाही’ असे !
-सरकार येवून १६ महिने झाले, इतक्या दिवसांत अभ्यास सोडून काय करत होता ? पक्ष फोडण्याच्या वेळेत अभ्यास करता आला नाही का ?
-माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष अनिल गोटे यांचे खडे बोल !

धुळे/अनिस खाटीक

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे सरकार घोषणा बहाद्दरांचे, लाभार्थी, लबाडांचे सरकार आहे. कोंबडा आरवतो खूप पण अंडे काही देत नाही अशी या सरकारची अवस्था झाली आहे. एकनाथ शिंदे व अजित पवारांची अवस्था तर, ‘ढेकणा संगे हिरा जो भंगला’ अशीच झाली आहे. कुठलाही प्रश्न सोडवाचाच नाही, नुसत्या थापा मारुन वेळ मारुन नेण्याच्या देवेंद्र फडणवीसांच्या ‘चलता है” स्वभावामुळे ‘जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहेत. संकटमोचन ‘यु पटवतो” असे सांगून फक्त कालापव्यय करायचा ! असल्या थापाड्या वृत्तीला मनोज जरांगे बळी पडणार नाहीत याची पुसटशी कल्पना सुध्दा त्यांना आली नाही. जरांगेचे आंदोलन भूपुत्राचे आहे. गरीब ‘मराठा’ समाजाच्या सर्वांगिण विकासाचा मार्ग मोकळा करण्यासाठी जरांगे पाटलांनी आंदोलनाचा मार्ग स्विकारला. हाडाच्या कार्यकर्त्याला पटवणं अथवा नमवणं सोप नाही याची जाणीव राज्यातील तीन पायाच्या सरकारला येवू नये. याचेच आश्चर्य वाटते.दिवसेंदिवस क्षणाक्षणाला जरांगे पाटलांची प्रकृती ढासळत आहे. त्यांचे प्राण कसे वाचवायचे? याची चिंता करण्याऐवजी भाजपाची पोपटपंची सुरु आहे. असा अहवाल यावा लागेल, विधी मंडळात ठराव करावा लागेल, केंद्राकडे पाठवावा लागेल, असली बालीश व बाळबोध वक्तव्ये करीत आहेत.

फडणवीस विरोधी पक्षनेते असतांना तीन महिन्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवतो अशा फुशारक्या मारत होते. शिंदेच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांचे सरकार येवून थोडे-थोडके नव्हे तब्बल सोळा महिने उलटले आहेत. मग इतके दिवस तुम्ही करत काय होतात? असा प्रश्न उभा रहातो. तब्बल १६ महिने म्हणजे ४८० दिवसात तुमचा अभ्यास पूर्ण होवू शकला नाही का? दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात व विरोधकांमागे ई.डी. फिडी लावण्यात वेळ घालविण्यापेक्षा मराठा-धनगर आरक्षण, एस. टी. कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याचा प्रश्न राज्यात उदभवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात कशी करता येईल? इत्यादी ज्वलंत प्रश्नांच्या अभ्यासासाठी वेळाचा सदुपयोग केला असता तर, किसानपुत्र जरांगे पाटलांचे प्राण तरी पणाला लागले नसते! आश्चर्य असे की, सत्तारुढ पक्षाचेच नेते मराठा आणि कुणबी असे निरर्थक वाद उपस्थित करुन मराठ्यांना ठरवून उकसवत आहेत की काय असेच वातावरण राज्यात सर्वदूर पसरले आहे.

देशाचे सर्वोच्च नेते नरेंद्र मोदी महाराष्ट्रात नुकतीच एक खेप टाकून गेले. पण जसे आले तसेच गेले. जाता-जाता शरद पवारांनी केले काय? असा अवमानजनक प्रश्न विचारुन अजित पवारांची आणि त्यांच्या लाभार्थी सहकाऱ्यांची आपल्या लेखी काय किंमत आहे हे सर्व देशाला दर्शवून गेलेत, असे सडेतोड व खडे बोल सुनावणारे पत्रक माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष अनिल अण्णा गोटे यांनी प्रसिध्दीस दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!