उल्लेखनीय सेवे करीता मोनिका अशोक शिंपी यांना राष्ट्रपती पदक.

धुळे /अनिस खाटीक

होमगार्ड व नागरी संरक्षण दलातिल

गुणवत्तापुर्ण/उल्लेखनीय सेवेकरिता राष्ट्रपती याचे घोषित झालेले पदक व प्रशंसापत्र होमगार्ड मुख्यालय मुंबई येथे मा. महासमादेशक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांचे हस्ते सौ. मोनिका अशोक शिंपी(म. होमगार्ड स.क्रं. 5321 धुळे जिल्हा) यांना प्रदान करण्यात आले यावेळी उपस्थित श्री. प्रभातकुमार (उपमहासमादेशक), कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी श्री. विजय पवार सदर हे पदक मिळवण्यासाठी
श्री. किशोर काळे (जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक धुळे), केंद्र नायक श्री. दीपक चौधरी, प्रशासकीय अधिकारी दिनेश दसनूरकर, सामुग्री प्रबंधक सुभेदार श्री. मंगल पाटील, प्रमुख लिपिक श्री. विलास परदेशी, श्री. नन्नवरे सर श्री. साळवी सर, वाहन चालक श्री. केशव भालेराव, समादेशक अधिकारी श्री. दिनेश मराठे इ. यांनी बहुमोलाचे मार्गदर्शन केले.