धुळे शहरातील मोटर सायकल चोराच्या मुसक्या आवळल्या.देवपूर पोलिसांची कामगिरी..

धुळे/अनिस खाटीक

धुळे शहरातील मोटार सायकल चोरीला आळा घालुन चोरीच्या गुन्हयाना अटकाव करणेकामी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड सो. यांनी देवपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना वेळोवेळी आदेशीत केले होते.

दिनाक ०१/ ११ / २०२३ रोजी सांयकाळी ०५.०० वा.सु. शोध पथकातील पोलीस अंमलदार हे पेट्रोलींग फिरत असताना दत्तमंदीर चौकातुन एक इसम मोटर सायकल घेवुन भरधाव वेगात नरढाणा चौफुली कडे संशईत रित्या जाताना दिसल्याने त्यांचेवर संशय आल्याने त्याचा पाठलाग करुन त्यास थांबवुन विचारपुस करता तो प्रथम उडवा उडवीचे उत्तरे देवु लागला करिता त्याचा संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन पोलीस ठाण्यात आणुन विश्वासात घेवुन विचारपुस करता त्याने त्याचे नाव सागर मच्छींद्र पाटील वय २७ राहणार धमाणे ता. जि. धुळे असे सांगीतले तसेच त्याचे ताब्यातील मोटर सायकल हिरो होण्डा कंपनीची स्पेल्डर प्लस मॉडेल असलेल्या काळया रंगाची तिच्यावर पांढ-या रंगाचा पटटा असलेली जीचा क्रंमाक एम. एच. १५ ए.एल. ६८१७ असा असलेली चोरी केले बाबत कबुली दिली तसेच देवपुर भागातील दत्तमंदिर परीसरातुन तीन स्पोर्टस सायकली चोरल्या असल्याची कबुली दिली असुन त्याने एक मोटार सायकल व तीन स्पोर्टस सायकली काढुन दिलेल्या असुन त्याचेकडुन एक मोटार सायकल व तीन स्पोर्ट सायकली हस्तगत करण्यात आल्या असुन त्यास देवपुर पोलीस स्टेशन गु.र.नं. २७१/ २०२३ भा.द.वि. कलम ३७९ प्रमाणे ह्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली असुन पुढील तपास पोहेकॉ / सतीष साळुंके व पोहेकॉ / रविंद्र मोराणीस हे करीत आहेत. सदरची कारवाई मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. संजय बारकुंड यांचे आदेशान्वये मा. अपर
पोलीस अधीक्षक श्री. किशोर काळे सो व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सचिन हिरे सो. यांचे
मार्गदर्शनखाली देवपुर पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. सतिष घोटेकर साहेब पोसई / राजेंश एस. इंदवे,
असई / मिलींद सोनवणे, पोहेकॉ पंकज चव्हाण, पोना/महेंद्र भदाणे, पोकों/राहुल गुंजाळ, पोकों/सागर थाटसिंगारे,
पोकॉ/ सौरभ कुटे, पोकों/एस.एम. गवळे यांनी केली आहे.