डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तरुणाचा मृत्यू झाल्या प्रकरणी डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करा, पोलीस अधीक्षकांना निवेदन..

धुळे /प्रतिनिधि.

शहरातील चाळीसगाव – रोड परिसरात असलेल्या एका खासगी रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे ३२ वर्षीय अक्रम बशीर शेख याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

१० ऑगस्ट २०२३ रोजी चाळीसगाव रोड पोलिस स्टेशनमध्ये तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र, अद्याप या प्रकरणात सहभागी असलेल्याडॉक्टरांचाकोणताही तपास झालेला नाही. त्यामुळे संबंधित डॉक्टरांची तातडीने चौकशी करून त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करण्याचीमागणी मयत अक्रम बशीर शेख यांच्या नातेवाईकांनी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांना नियोजन देते वेळी बशीर अमीर शेखशाहरुख बशीर शेख, अकबर सर, जमीर दादा, अब्दुल रशीद शेख, सलीम मोहम्मद अन्सारी, कालू पठाण, रसूल अमीर शेख, रियाझ शेख, जाविद शेख, बादशाह काझी, इरफान यांच्यासह स्थानिक नागरिक देखील उपस्थित होते.