24 प्राईम न्यूज 4 Oct 2023

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषणा

ला बसलेले मनोज जरांगे पाटील यांची गुरुवारी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत राज्य सरकारच्या मंत्र्यांसह २ निवृत्त न्यायाधीशांचाही समावेश होता. या शिष्टमंडळाने मराठा समाजाचा छोटा गोळा करण्याचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगत आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी राज्य सरकारला वेळ द्यावा, अशी विनंती जरांगे-पाटील यांना केली. जरांगे-पाटलांनीही राज्य सरकारच्या विनंतीला मान देत उपोषण मागे घेतले आणि सरकारला शेवटची संधी दिली, परंतु हा नवा अल्टिमेटम देताना मनोज जरांगे- पाटील यांनी राज्य सरकारला २ महिन्यांचा म्हणजेच २ जानेवारी २०२४ पर्यंतचा वेळ दिल्याचा दावा राज्य सरकारकडून केला जात आहे. तर मनोज जरांनी हा दावा खोडून काढत राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतचा वेळ दिल्याचे सांगितले आहे. या दाव्या-प्रतिदाव्यामुळे जरांगे पाटील यांचे उपोषण सुटले असले तरी आरक्षणप्रश्नी सरकारसोबतचा तिढा कायम असल्याचे दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!