-तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा. -शासना विरोधात अर्धनग्न आंदोलन. -महाविकास आघाडी तर्फे मागणी.

अमळनेर/प्रतिनिधि

तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा आणि पीक विम्याची अग्रीम रक्कम मिळावी म्हणून

तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेनेनेसह शेतकऱ्यांनी प्रंतकर्याल्यवर सरकार विरोधात घोषणा देत मोर्चा काढला अमळनेर तालुक्यातील आठही मंडळात खरीप हंगाम २०२३ मधील पावसाळ्यात एकवीस दिवसांपेक्षा जास्त पावसाचा खंड असल्याने खरीप पीक विमा नियमानुसार खरीप कापूस पिकाचे ताबडतोब शेतकऱ्यांना २५% पिक विमा रक्कम मिळणे आवश्यक असताना अद्याप पावेतो रक्कम मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात व उपाशी जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना भेडसावत आहे तरी ती रक्कम दिवाळीपूर्वी मिळावी
तसेच अमळनेर तालुक्यातील आठही मंडळाची आणेवारी ५०% पेक्षा कमी असल्याने व पावसाचा मोठा खंड मुळे आठही मंडळातील खरीप पिकांचे उदा. कापूस, मुग, उडीद, ज्वारी, बाजरी, तुर, भुईमूग इ. उत्पन्न ३०% पेक्षा कमी येणार आहे त्यामुळे अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणे आवश्यक असताना शासनाच्या प्रथम दुष्काळग्रस्त यादीत अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर केलेला नाही तरी शासनाने दुष्काळग्रस्त यादीत दुरुस्ती करून अमळनेर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करून तस्तम मदत मिळावी
वरील दोन्ही मागण्या दिवाळीपूर्वी मान्य न झाल्यास पहिल्या टप्प्यात तहसील कार्यालय जवळ १. दि.२०/११/२०२३ पासून अमळनेर तालुक्यातील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व शेतकरी धरणे आंदोलन करणार आहेत दुसऱ्या टप्प्यात दि.२७/११/२०२३ पासून आमरण उपोषणाला बसणार आहेत याची शासनाने व प्रशासनाने दखल घेऊन लवकरात लवकर वेळेच्या आत वरील दोन्ही मागण्या मान्य कराव्यात अन्यथा पुढील जबाबदारी शासनाची व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावीप्रांताधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देवून जर तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही तर 20 नोव्हेंबर पासून धरणे आंदोलन करण्यात येईल व त्यांनंतर 27 नोव्हेंबर पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला. मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गोकुळ बोरसे, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख विजय पाटील, राकाँच्या प्रदेश सरचिटणीस तिलोत्तमा पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, शिवसेनेचे अनंत निकम, किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पाटील, कार्याध्यक्ष प्रा सुभाष पाटील, खान्देश शिक्षण मंडळाचे चेअरमन डॉ अनिल शिंदे, प्रवीण जैन, बी के सूर्यवंशी, घनश्याम पाटील, तुषार संदानशीव, सनी गायकवाड, दिलीप पाटील, प्रताप पाटील, नीलकंठ पाटील, सचिन वाघ, हर्षल जाधव, सुशील पाटील, डॉ महेश ठाकरे, धनगर पाटील, डॉ किरण पाटील, मुशीर शेख, राजेंद्र देशमुख, शांताराम पाटील, प्रवीण पाटील, मनोहर पाटील, ललित पाटील, अनिरुद्ध शिसोदे, दीपक शिसोदे, प्रवीण देशमुख, मयूर पाटील, ज्ञानेश्वर पाटील यांच्यासह काही शेतकरी सहभागी । होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचि पाटील व सेनेचे अनंत निकम हे निषेध म्हणून डोक्याला काळे फडके बांधून अर्धनग्नडोक्याला काळे फडके बांधून अर्धनग्न अवस्थेत मोर्चाचे नेतृत्व करत होते. सचिन पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मंत्री आणि अधिकारी शेतकरी पुत्र असल्याचे सांगतात, मात्र हे सत्तेत असूनही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडतात. तालुका दुष्काळी जाहीर झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी मारवड येथील शेतकरी दिलीप पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांनी अर्वाच्य भाषा वापरून शेतकऱ्याला हिणवल्याचा आरोप केला. यावेळी सरकार व मंत्र्यांविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.