गोंदेगावसह सात गावांचा वर्षभरापासून बंद असलेला सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरळीत ; वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याने प्रश्न मार्गी..

सोयगाव/साईदास पवार

सोयगाव तालुक्यातील महावितरण कंपनीच्या गोंदेगाव येथील ३३ के व्ही गोंदेगांव अंतर्गत येणाऱ्या ११ के व्ही निभोंरा ए जी (जंगल) फिडर आणि ११ के व्ही धाप ए जी (जंगल)फिडर वरील सिंगल फेज सप्लाय गोंदेगांव, निभोंरा, गलवाडा, म्हशीकोटा, तीतूर, उप्पलखेडा, धाप या सात गावांची सिंगल फेज प्रवाह गेल्या एक वर्षापासून बंद करण्यात आला होता.याप्रकरणी वंचित बहुजन आघाडीने वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा करून हा विद्युत पुरवठा पूर्वरत सुरू केला आहे.
गोंदेगावचे वंचित बहुजन आघाडी तालुका माजी सचिव दिलीप रघुनाथ सोनवणे यांनी सरपंच, गोंदेगाव, निभोंरा, तीतूर, उप्पलखेडा यांच्या सिंगल फेज चालू करण्यात बाबत असे पत्र घेऊन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाअध्यक्ष प्रभाकर बकले यांच्या मार्फत कार्यकारी अभियंता महावितरन सिल्लोड, उपकार्यकारी अभियंता बिडे सोयगाव, आणि कनिष्ट अभियंता बनोटी यांना दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ ला पत्र दिले होते.

त्यानंतर जिल्हा अध्यक्ष बकले आणि दिलीप सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना वारंवार फोनवरून व प्रत्यक्ष भेटून हा प्रश्न कायमचा मार्गी लावून सात

गावांना न्याय मिळून दिला आहे.