भाग्यश्री लांडगे यांचे भारतीय नौसेनेत निवड.

मालपुर प्रतिनिधी / प्रभाकर अडगाळे

नासिक येथील भोसला सैनिकी महाविद्यालय विद्यार्थिनी कुमारी भाग्यश्री विश्वास लांडगे यांची सुकन्या असून भारतीयनौ सेनेत निवड झाल्याबद्दल परिसरात व नातेवाईकांकडून तिच्या यशाला, अभिनंदन वर्षाव होत आहे. भाग्यश्री लांडगे हिचे स्वागत प्राचार्य, स्कूलचे सर्व मार्गदर्शक शिक्षकांनी कौतुक केले आहे. भाग्यश्री लांडगे ही एक गरीब कुटुंबातील मुलगी असून तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक,होत आहे.भाग्यश्री लांडगे ही 17 नोव्हेंबर पासून प्रशिक्षणाला जाणार आहे. ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी असून खामखेडा टेकवडे हे शिरपूर तालुक्यातील गाव आहे, तिचे वडील कामानिमित्ताने नाशिक येथे स्थायिक झालेत.त्यांना एक मुलगा, व एक मुलगी असा छोटा परिवार आहेत.. कुमारी. भाग्यश्री लांडगे ही पत्रकार प्रभाकर सर याची नात आहे.

