गृहमंत्र्यांचे गुंडगिरीला अभय आहे का? खासदार सुप्रिया सुळे

24 प्राईम न्यूज 5 Nov 2023

भिंतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर लिहिल्यावरून पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात दोन गट आमनेसामने आल्याची घटना नुकतीच घडली. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) कार्याध्यक्षा आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या गुंडगिरीला अभय आहे का? याचाही खुलासा यानिमित्ताने व्हायला हवा, असे त्यांनी म्हटले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्या

पीठात भाजपप्रणीत विद्यार्थी संघटनेच्या मुलांनी दुसऱ्या विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि त्यानंतर विद्यापीठात आंदोलन करायला सुरुवात केली. कोणत्याही शैक्षणिक परिसरात अशा पद्धतीने राजकारणाचे खेळ करणे सत्ताधारी पक्षाला शोभत नाही. शैक्षणिक परिसराचे पावित्र्य आणि शांतता भंग करण्याचा अधिकार या लोकांना नाही, असे त्यांनी सुनावले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खेड्यापाड्यातून आलेल्या गरीब विद्यार्थ्यांना मारहाण करणारे गुंड विद्यापीठात कसे घुसले आणि त्यांनी कोणत्या अधि
काराने मुलांना मारहाण केली

याची कसून चौकशी होण्याची गरज आहे. गृहमंत्री फडणवीस यांचे या गुंडगिरीला अभय आहे का? याचाही खुलासा यानिमित्ताने व्हायला हवा. विद्यापीठाच्या कुलगुरूंनी याबाबत तातडीने निर्णय घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.