भुजबळ – जरांगे वाद पेटला! भुजबळांच्या ‘करेंगे या मरेंगे ‘ला जरांगेंचे ‘लडेंगे और जितेंगे ‘चे प्रत्युत्तर

24 प्राईम न्यूज 7 Nov 2023

ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ व मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला आहे. कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणारे सत्तेच्या बाहेर जातील. मागच्या दाराने
ओबीसीमध्ये घुसू पाहणाऱ्यांना ‘करेंगे या मरेंगे’ तत्त्वाने विरोध करण्याचा निर्धार भुजबळ यांनी व्यक्त केला आहे. त्यावर ‘लडेंगे और जितेंग’ असे म्हणत त्यांच्या प्रश्नांना जरांगे-पाटील यांनी आक्रमक पद्धतीने उत्तरे दिली आहेत.

राज्यात मराठा आरक्षणाचा वाद पेटलेला असतानाच राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटपाला विरोध करून याविरोधात लढा देण्याचा इशारा दिला. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे यांनी भुजबळांना ‘लडेंगे और जितेंगे भी’, असे खणखणीत उत्तर दिले आहे. त्यामुळे आता कुणबी प्रमाणपत्रावरून ओबीसी मराठा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.