जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अमळनेर येथील सुवर्णा धनगर.

अमळनेर /प्रतिनिधि

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महिला हक्क संरक्षण समितीच्या अमळनेर येथील सुवर्णा धनगर यांची

निवड करण्यात आली आहे.
शेगाव येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य जि.प.आरोग्य कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठकित राज्याध्यक्ष शिवराज जाधव यांनी ही नियुक्ती केली आहे. सुवर्णा धनगर या आदर्श शिक्षक ए बी धनगर यांच्या पत्नी आहेत.
राज्याध्यक्ष शिवराज जाधव , कोषाध्यक्ष पुरुषोत्तम वैष्णव , महिला सरचिटणीस निकम ,राज्य कार्याध्यक्ष वसंत बैसाणे , सहाय्यक गट विकास अधिकारी आदरणीय अजय चौधरी यांच्यासह राज्यभरातून सर्व जिल्हा पदाधिकारी बैठकीस उपस्थित होते.
या निवडीचे योगेश सनेर ,मंगेश भोईटे, तुषार बोरसे , डी ए धनगर , संजय पाटील, जितेंद्र मोरे,अजित बाविस्कर, प्रेमलता पाटील, अजय चौधरी, एन एस पवार , कुणाल पवार, राकेश शिंपी, सुनील ढाके, ज्ञानेश्वर पाटील, देवेंद्र पाटील, वहिदाबी खान, अरुणा सूर्यवंशी, सुवर्णा भोपे यांनी स्वागत केले आहे.