एकनाथ खडसे रुग्णालयात हायपर अॅसिडीटीचा त्रास.

24 प्राईम न्यूज 6 Nov 2023
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हायपर अॅसिडीटीचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, त्यांच्या निकटवर्तीयांनी त्याचे खंडन केले.

खडसे यांना हायपर अॅसिडीटीचा त्रास असल्याने दोन दिवसांपासून मुक्ताई नगर येथील गजानन रुग्णालयात दाखल केले होते.
