एसटी संपाचा निर्णय मागे..

0

24 प्राईम न्यूज 7 Nov 2023

सातवा वेतन आयोग लागू करण्याच्या मागणीसाठी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाने संपाचा इशारा दिला होता, परंतु उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. या बैठकीत ४ महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर त्यावर तोडगा काढणे आमचे काम आहे. त्यामुळे या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत दिवाळीनंतर बैठक होणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. एसटी कर्मचाऱ्यां

च्या बोनसमध्ये वाढ झाली पाहिजे यासाठी मुख्यमंत्री शिंदे निर्णय घेऊन जाहीर करतील. त्याचबरोबर आगामी काळात २२०० नवीन गाड्या येणार आहेत, तर २०२५-२६मध्ये २५०० नवीन बसगाड्या येतील. येणाऱ्या अडीच वर्षांमध्ये तब्बल २५०० इव्ही गाड्या दाखल होणार आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!