जिल्हा परिषद कर्मचाऱ्याची रेल्वेखाली आत्महत्या..

0

अमळनेर/प्रतिनिधि

अमळनेर-येथील रहिवासी तथा जळगाव जिल्हा परिषदेचा कर्मचारी नितीन अरविंद पाटील(बोरसे) वय 50 याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचो घटना दि 6 रोजी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास चोपडा रेल्वे गेटजवळ (गोशाळा) येथे घडली.
नितीन हा जळगाव येथे जि

ल्हा परिषदेत कार्यरत होता त्याचे कुटुंब जळगाव येथे तर आई अमळनेर येथे समर्थ नगर येथे वास्तव्यास होती.त्याने रेल्वेखाली झोकून दिल्यानंतर गार्ड च्या लक्षात आल्याने त्याने जवळ जाऊन पाहिले असता त्याच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली.अमळनेर ग्रामिण रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन होऊन अमळनेर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली वावरत असल्याने त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले असावे अशी चर्चा सर्वत्र होती.याबाबत अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. त्याच्या पश्चात पत्नी, आई,मुले असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!