गावठी हातभट्टीवर छापा टाकून हातभट्या केल्या उद्ध्वस्त. पोलीस निरीक्षकांची मोठी कारवाई.

अमळनेर/प्रतिनिधि प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, गावठी हात भट्टी दारुच्या व्यसनामुळे अनेक कुटुंबाचे संसार उदध्वस्त होतात म्हणनुच अवैध गावठी हात भट्टी दारुवर कठोर प्रतिबंधक कारवाईच्या अभियान अमळनेर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी हाती घेतले असुन त्याची सुरुवात करण्यात आली.
आज रोजी वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी स्वता समक्ष व त्यांच्या पथकाने अमळनेर शहरात तसेच जानवे व गडखांब शिवारात वेगवेगळ्या ठिकाणी गैरकायदा गावठी हात भट्टीवर छापा टाकुन दारुबंदी सदराखाली कारवाई केली आहे.
एकुण कारवाईत दहा अरोपीतांवर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले असुन दाखल सहा गुन्ह्यांत खालीलप्रमाणे मुद्देमाल मिळुन आला आहे.
१) १,३५,०००/- रु. कि. च्या तीन मोटर सायकल कि.अ.
२) १७,७००/- रु. कि.ची १७७ लिटर गावठी हात भट्टी तयार दारु कि.अ.
३) १,०९८७५/- रु. कि. चे १४६५ लिटर गावठी हात भट्टीची दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन कि.अ.
एकुण- २,६२,५७५/- रु.
वर प्रमाणे माल पकडुन जागीच नाश करण्यात आला असुन दाखल गुन्ह्यांचा तपास चालू आहे तसेच यापुढे देखील असेच मोठ्या कारवाई करण्याचे अभियान सतत राबविण्यात येणार आहे.
सदरची कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विजय शिंदे यांनी स्वतः तसेच सपोनि. श्री. हरीदास बोचरे, पोउनि. श्री. विकास शिरोळे, पोहवा/संदेश पाटील, पोहवा/सुनिल जाधव, पोहवा / विजय भोई, पोहवा/कैलास शिंदे, पोहवा / हितेश चिंचोरे, पोना/दिपक माळी, पोना/रविंद्र पाटील, पोना/ जयंत सपकाळे, पोकों/भुषण पाटील, पोकों/योगेश बागुल, मपोकाँ/नम्रता जरे, मपोका /मोनिका पाटील अश्यांच्या पथकाने केली आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री. एम. रामकुमार सो., मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. रमेश चोपडे सो. व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुनिल नंदवाळकर सो. यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली असुन ते देखील स्वता लक्ष ठेवुन आहेत.