मराठा आरक्षणाबाबत सरकार उदासीन ! राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका..

24 प्राईम न्यूज 8 Nov 2023 मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार उदासीन आहे. आरक्षणाबाबत मुख्यमंत्री एक बोलताहेत, उपमुख्यमंत्री दुसरे, तर अर्थमंत्री तिसरेच बोलत आहेत. यावरून मराठा आरक्षणाबाबत सरकारचे एकमत नाही, हे स्पष्ट होते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा विषय गांभीर्याने घेऊन तो लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणीही त्यांनी केली.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात मराठा आणि ओबीसी समाज अशी फूट पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली. राष्ट्रवादी पक्ष मराठाआरक्षणाबाबत ठाम आहे. मात्र, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण दिले पाहिजे, असे ते म्हणाले.