राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोंडाईचा शहराध्यक्षपदी भारत जाधव यांची निवड करण्यात आली..

दोंडाईचा / प्रतिनिधी /रईस शेख

दोंडाईचा येथील सामाजिक कार्यकर्ते भारत रविंद्र जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोंडाईचा शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व धुळे जिल्हाध्यक्ष सुमित मारोती पवार यांनी दोंडाईचा शहर कार्यकारणी जाहीर केली. असून या कार्यकारणीत दोंडाईचा अध्यक्षपदी येथील भारत जाधव सामाजिक कार्यकर्ते यांची नियुक्ती केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. पक्ष संघटन मजबूत करून आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यश संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जोमाने कामाला लागावे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्याचे धुळे जिल्हाध्यक्ष सुमित मारोती पवार यांनी नियुक्ती पत्रात नमूद केले आहे. दोंडाईचा शहर अध्यक्षपदी भारत रविंद्र जाधव यांची निवड झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले.पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा दिले .