इर्शाद जहागीरदार यांच्या स्वखर्चाने राधाकृष्णन मंदिरात बोअरवेल सुविधा.

धुळे /अनीस खाटीक

अजित दादा पवार यांच्या सामाजिक बांधीलकीच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागिरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरातील कृष्ण कमल हौसिंग सोसायटी गोळीबार टेकडी धान्य गोडाऊन परिसरातील राधाकृष्ण मंदिर येथे पाण्याची टाकी व बोअरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून दिली. या बोअरवेलचे उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागिरदार, शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी,मा तालुका अध्यक्ष राजेंद्र चितोडकर, सुरेश अहिरे सर उमेश महाजन ज्ञानेश्वर माळी ईश्वर माळी निलेश माऊली दीपक जडे आबासाहेब अमृतकर यशवंत अमृतकर सुरेश वाडे विजय वाघ राजेंद्र बोरुडे महिला शहर जिल्हाध्यक्ष जया साळुंखे, संगीता खैरनार जयश्री वाडे कल्पना देशमुख मीना बागड मंजू वाडे निशा अमृतकर शकुंतला चौधरी रंजिनी लिंगायत जेष्ठ नागरिक तरुण वर्ग व महिला मंडळ मोठ्या उपस्थित होत.