आम्हाला ओबीसीतून बाहेर काढण्याचा डाव. –
– भुजबळ यांचा सरकारला घरचा आहेर

24 प्राईम न्यूज 9 Nov 2023

आरक्षणासाठी पात्र नसलेल्यांना एका बाजूला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीत समाविष्ट करुन घ्यायचे आणि दुसरीकडे न्यायालयात याचिका दाखल करुन सध्या ओबीसी प्रवर्गात असलेल्या जातींना बाहेर ढकलायचे, अशा दुहेरी रणनीतीचा कार्यक्रम सुरू आहे. याद्वारे आम्हाला ओबीसीतून बाहेर काढण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी बुधवारी येथे केला. ‘या आणि कुणबी जातीचे प्रमाणपत्र घेऊन जा’ ही पद्धत चुकीची आहे, अशी टीकाही त्यांनी स्वतःच्याच सरकारवर केली.