मालपुर प्राथमिक आरोग्य केंद्रात, मानव विकास कॅम्प सुरु,

धुळे/अनिस खाटीक
मालपुर प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे. दर महिन्याला नऊ तारखेला मानव विकास कॅम्प हा होत असतो, हे अभियान पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान म्हणून ओळखले जाते,. मालपुर हे शिंदखेडा तालुक्यातील फार मोठे गाव आहे येथे प्राथमिक आरोग्य केंद्राला, सुराय, कर्ली,परसोडे चुडाने, देवी रेवाडी सतारे आधी गावांचा समावेश होत असतो. आजच्या या कॅम्पला आशा वर्कर, बेमुदत संपावर गेल्यामुळे, तारा बंद उडाला, त्यांच्याशी संपर्क झाला नसल्यामुळे, बरेचसे महिला माता आजच्या कॅम्पला हजर राहू शकले नाहीत, फक्त मालपुर च्या महिला भगिनी हजर होत्या, त्यांची तपासणी मालपुर प्राथमिक आरोग्य केंद्राची वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिपिन सोनवणे यांच्या देखरेकी, मार्गदर्शनाने झाली, महिला मातांना पोषण आहार देण्यात आला, मालपुर प्राथमिक आरोग्य केंद्राला अनेक पदे रिक्त असून मनुष्यबळ कमी पडत आहे येथील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली,
एकीकडे मानवी मिशन कॅम्प, तर दुसरीकडे ओपीडी काढण्यात आली. वारंवार वृत्तपत्रात छापून देखील अधिकारी लोकांची रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष आहे, त्याचे झळ सर्वसामान्य माणसालाबसत असते.” जनसेवा हीच ईश्वर सेवा ” ह्या ब्रीदवाक्याला खऱ्या अर्थाने महत्त्व केव्हा येईल कंत्राटी सेवक म्हणून भरती केली जाते, दिवाळीच्या तोंडाला संप. काढतात. तरी संबंधित अधिकाऱ्यांना विनंती आहे की रिक्त पदे त्वरित भरण्याची दखल घ्यावी अशी मालपुर व परिसरातील लोकांची आहे.