मटका अड्यावर पोलिसांची धाड सट्टा घेणाऱ्या तिघांवर केली कारवाई ..

अमळनेर/ प्रतिनिधि

अमळनेर उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातील पीएसआय विलास पाटील, हेकॉ भटू तोमर,का मेघराज महाजन, पोना प्रमोद बागडे, पोकॉ हितेश बेहेरे, पोकॉ गणेश पाटील यांच्या पथकाने तालुक्यातील अमळगाव येथे छापा टाकून नागरिकांकडून सट्टा घेणाऱ्या तिघांना रंगेहाथ पकडले. यात निलेश सुपडू भील (वय 27) याचेकडून 1210 रुपये व सट्ट्याचे साहित्य, नारायण पारधी (वय 62) याचेकडून 5140 रु. व सट्ट्याचे साहित्य, व भाईदास पारधी (वय 52 ) याच्याकडून 1170 रुपये व सट्ट्याचे साहित्य मिळून आले आहे. डीवायएसपी सुनिल नंदवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरची
कारवाई करण्यात आली असून मारवड पोलिसांत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेकॉ सुनील अगोने हे करीत आहेत.