दारूच्या नशेत मित्राची हत्या करणाऱ्या आरोपीला जन्मठेप..

0


अमळनेर /प्रतिनिधि

एक वेळेस आवश्य भेट द्या

दारूच्या नशेत बायकोवरून झालेल्या भांडणात मित्राला कमरेला लावलेल्या पट्याने गळा आवळत गुप्तांगावर मारहाण करून मित्राची हत्या करणाऱ्या एकाला अमळनेर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
आरोपी लहू अशोक भिल वय २९ रा.अकुलखेडे ता.चोपडा जि.जळगाव हा २ ऑक्टोबर २०२२ रोजी मित्र दिनेश वेरसिंग सस्ते यांच्या सोबत दारू पिण्यासाठी अकुलखेडे येथील पाटचारी जवळ असलेल्या लोखंडी पुलाजवळ दारू प्यायला बसले.त्याचवेळी दोघांमध्ये पत्नीवरून भांडण झाले.त्यानंतर दोघांमध्ये मारामारी झाली.यात आरोपीने त्याच्या कमरेला लावलेल्या पट्याने मयताचा गळा आवळला व पायात घातलेल्या बुटाने गुप्तांगावर लाथ मारली.त्याला जखमी अवस्थेत सोडून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.यात जखमी अवस्थेत पडलेल्या दिनेश सस्ते याचा मृत्यू झाला होता.याबाबत मयताच्या भावाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस उपनिरीक्षक अवतारसिंग चव्हाण व पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत यांनी घटनेचा तपास केला.प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराच्या जबाबवरून विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली होती.
सदर खटल्यात १२ साक्षीदार तपासण्यात आले.त्यात फिर्यादी दिलीप वेरसिंग सस्ते,प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मुन्ना रविंद्र पवार,डॉ.चंद्रहास पाटील,तपासणी अधिकारी यांची साक्षी घेण्यात आल्या होत्या.त्यात मुन्ना पवार व डॉ.चंद्रहास पाटील यांची साक्ष महत्वाची ठरवत जिल्ह्या न्यायाधीश २ पी आर चौधरी यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा व ५०० रुपये दंड,दंड न भरल्यास १५दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.सरकारी वकील आर बी चौधरी यांनी युक्तिवाद केला.तर पैरवी अधिकारी उदयसिंग साळुंखे,पोलीस नाईक हिरालाल पाटील,नितीन पाटील,राहुल रणधीर व अतुल पाटील यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!