सिकंदर शेख यंदाचा महाराष्ट्र केसरी ! गतविजेता शिवराज राक्षेला दाखवलं आस्मान..

24 प्राईम न्यूज 11 Nov 2023

महाराष्ट्र केसरी 2023-24 (Maharashtra Kesari) च्या अंतिम सामन्याचा निकाल लागला असून वाशिमच्या सिकंदर शेख (Sikandar Shaikh) याला महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळाला आहे. सिकंदर शेख याने गतविजेत्या शिवराज राक्षेला (Shivraj Rakshe) चीत करत बाजी मारली आहे. 2022-23 च्या महाराष्ट्र केसरी विजेत्या शिवराज राक्षेला अवघ्या दहा सेकंदामध्ये आस्मान दाखवत सिकंदर शेख याने 66 वा महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. पुण्यातील फुलगाव येथे यंदाची 66 वा महाराष्ट्र केसरी स्पर्धा संपन्न होत सिकंदर शेखच्या विजयानंतर कुस्ती चाहत्यांनी एकच जल्लोष केल्याचे दिसून आले.