आमचं वाटोळं कोण करतंय, त्यांची नावं २४ तारखेला सांगतो
मनोज जरांगे-पाटलांचा इशारा कुणाला ?


24 प्राईम न्यूज 11 Nov 2023 तुम्ही कुणासाठी काम करता हे आम्हाला आता कळलं असून, तुमच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही, वेळोवेळी वेगवगेळी वक्तव्य करून तुम्ही सरड्यासारखे रंग बदलत आहात. तुमच्यासारखा विरोधी पक्ष देशात कुणी नाही, तुमची विचारधारा मराठ्यांविषयी विष पेरणारी असून मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, असे आरोप करत येत्या २४ डिसेंबरला मराठा समाजाचे वाटोळं करणाऱ्या सहा जणांची नावेही सांगतो, असा इशाराच मनोज जरांगे यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणावरून राज्यात रान पेटले असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यांनंतर मनोज जरांगे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विजय वडेट्टीवार यांनी म्हटले की, ‘मराठा तरुणांनी अभ्यास करून विचार करून आपण कोणाला साथ देत आहे, आपला भलं कशात आहे, हित कशात आहे, याचा विचार करावा, असे विधान केले आहे. यावर प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली आहे. ते म्हणाले की, आम्हाला मोडायचा सामूहिक कट तुम्ही रचला होता. आता फालतू शब्द बोलून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करत आहात. पण आमची मुलं दूधखुळी नाहीत, मराठ्यांचे मुडदे पडायला तुम्ही जबाबदार आहात, आता तुमच्या सल्ल्याची सुद्धा गरज नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी वडेट्टीवार यांना सुनावले आहे.