राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रंथालय विभाग अमळनेर तालुका अध्यक्ष पदी –श्री.डी.एम. पाटील यांची नियुक्ती..

अमळनेर/प्रतिनिधि

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांताध्यक्ष आदरणीय श्री.जयंतरावजी पाटील साहेबांच्या मान्यतानुसार तसेच ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. उमेश दादा पाटील यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेश उपाध्यक्ष तसेच मा.आ.श्री आबासाहेब डॉ.बी.एस. पाटील यांच्या हस्ते अमळनेर तालुका ग्रंथालय विभागाच्या तालुका अध्यक्ष पदी अमळनेर तालुका देखरेख संघाचे माजी अध्यक्ष व साने गुरुजी सार्वजनिक वाचनालय जानवे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. डी.एम. पाटील सर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . त्याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री. रविंद्र जाधव उपस्थित होते. यावेळी रणाईचे येथील श्री. हेमंत पाटील सर यांची जिल्हा उपाध्यक्ष ,श्री. किशोर जाधव यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक सौ. रिता ताई बावीस्कर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ. तिलोत्तमा ताई पाटील, तालुका अध्यक्ष श्री. सचिन पाटील, शहराध्यक्ष श्री. शाम पाटील, डॉ.किरण दादा पाटील यांनी अभिनंदन केले आहे.
