दिवाळीच्या दिवशी फटाका मार्केटला भीषण आग : १२ जण गंभीर

24 प्राईम न्यूज 13 Nov 2023

देशभर दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी होत असतांना मथुरेतील गोपाळबाग या परिसरात फटाका मार्केटला भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली होती. काही वेळातच आगीने अनेक दुकाने जळून खाक झाली. या अपघातात १२ जण गंभीर भाजले आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस आणि स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे

त. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातंय. या आगीने रौद्ररूप धारण केले होते त्यामुळे अग्निशमन दलाच्या तब्बल २ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र फटाक्यांचं अख्ख मार्केट जळून खाक झालं आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.