शरद पवार यांना विश्रांतीचा सल्ला..

24 प्राईम न्यूज 13 Nov 2023

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांना बारामतीतील एका संस्थेच्या बैठकीदरम्यान अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांची तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. तपासणीनंतर डॉक्टरांनी पवार यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीसाठी पवार आले असताना त्यांना अचानक त्रास जाणवू लागल्याने त्यांची डॉक्
टरांकडून तपासणी करण्यात आली.

आता शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे. डॉक्टरांनी पवारांची तब्येत तपासल्यानंतर त्यांनी नागरिकांना भेटायला सुरुवात केली आहे. दिवाळीनिमित्ताने पवारांना भेटण्यासाठी राज्यभरातील नागरिकांना त्यांच्या बारामतीतील घरासमोर तोबा गर्दी केली आहे. शरद पवार सध्या ८३ वर्षांचे असून दिवाळीनिमित्त सर्व पवार कुटुंब एकत्र बारामतीत दाखल झाले आहेत.