यशपाल ज्ञानेश्वर पवार यांची केंद्रीय गृह मंत्रालयात अधिकारीपदी निवड.

अमळनेर/ प्रतिनिधि.

अमळनेर तालुक्यातील मठगव्हाण येथील शेतकऱ्याचा मुलगा यशपाल ज्ञानेश्वर पवार याचे दहावी पर्यंतचे शिक्षण सानेगुरुजी शाळेत झाले असून त्याने १२ वी कला शिक्षण प्रताप महाविद्यालयात घेतले

. १२ वीला त्याला ९२ टक्के गुण मिळाले होते. नंतर त्याने स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी पुणे येथे बी ए पर्यंत शिक्षण घेतले. यशपाल उत्कृष्ट वक्ता आहे. त्याचे वडील ज्ञानेश्वर पवार हे शेतकरी असून त्यानी कष्ट करून आपल्या मुलाला प्रोत्साहन दिले आहे. शिक्षण घेत असताना त्याला त्याचे आई वडील यांनी नेहमीच प्रेरित केले. शालेय जीवनात त्याला मुख्याध्यापक एस डी देशमुख आणि डी ए धनगर व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाची महत्वाची परीक्षा झाली त्यात यशपाल यशस्वी ठरला आणि त्याची अतिशय महत्वाच्या जबाबदार अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.