भाजपचे वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाणार ?

24 प्राईम न्यूज 12 Nov 2023

उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार वरुण गांधी हे येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता असून त्याबद्दल सर्वांचे डोळे लागले आहेत. वरुण गांधी यांची त्यांचे चुलत बंधू व काँग्रेस नेते राहुल गांधी यांची केदारनाथ मंदिराबाहेर मंगळवारी भेट झाली, त्यामुळे वरुण गांधी यांच्या संबंधात आता राजकीय वर्तुळात चर्चांना जोर आला आहे.
गेल्या काही महिन्यांमध्ये भाजपच्या बैठकांमध्ये वरुण गांधी यांचा प्रमुख सहभाग असूनही त्यांच्या वक्तव्यांना फार महत्त्व दिले गेले नव्हते. महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल अगदी शेती कायद्यांतील सुधारणांबद्दलही त्यांची व पक्षाची भूमिकाही अनेकदा वेगळी असल्याचे दिसून आले होते. संजय गांधी आणि मनेका गांधी यांचे पुत्र असणारे वरुण गांधी यांच्या राहुल गांधी यांच्याबरोबर होणाऱ्या भेटींची संख्या फार नाही, तरीही राजकीय भवितव्याच्या दृष्टीने वरुण गांधी आणि राहुल गांधी यांच्या भेटी या अनेकदा आकर्षणाचा विषय बनला आहे.
वरुण आणि त्यांच्या मातोश्री मनेका गांधी हे दोघेही भाजपचे लोकसभा सदस्य आहेत, पण भाजपचे नेतृत्व आता त्यांना पक्षाच्या कार्यात फारसे सहभागी करत नाही. वरुणच्या मुलीला भेटून राहुल गांधी ‘खूप आनंदी’ झाले होते. “