मोहम्मद शमीने इतिहास रचला, एकदिवसीय सामन्यात भारतासाठी सर्वोत्तम गोलंदाजी केली, विक्रमांची मालिका रचली..

24 प्राईम न्यूज 16 Nov 2023

३० हजार प्रेक्षकांच्या साथीने मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या उपांत्य सामन्यात भारताने विजयी झेंडा फडकावला चार वर्षांपूर्वी २०१९च्या विश्वचषकात उपांत्य फेरीतच झालेल्या पराभवाचा वचपा अखेर भारतीय संघाने काढला. विराट कोहलीचा (११३ चेंडूंत ११७ धावा) सुवर्ण शतक महोत्सव, श्रेयस अय्यरचे (७० चेंडूंत १०५ धावा) सलग दुसरे शतक आणि मोहम्मद शमीने (५७ धावांत ७ बळी) नोंदवलेल्या कारकीर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजीच्या बळावर भारताने बुधवारी न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली भारताने सलग १० वा विजय नोंदवून तमाम देशवासियांची दिवाळी गोड केली.