वाळू माफियांकडून तलाठ्याला ट्रॅक्टरखाली चिरड्याचा प्रयत्न.. -सरकारी कामात अडथळा व महसूल कायद्यानुसार गुन्हा दाखल..

0

अमळनेर/ प्रतिनिधि

अवैध वाळू वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करणाऱ्या तलाठ्याला ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना अमळनेर तालुक्यातील पांतोडा शिवारात रविवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. तसेच वाळूमाफियांनी पथकातील इतरांना मारहाण करीत गंभीर जखमी केले. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील रणाईचे येथील तलाठी संदीप रामदास शिंदे हे तलाठी प्रकाश महाजन, मधुकर पाटील व मंडळ अधिकारी योगेश पाटील यांच्यासोबत अमळनेर तालुक्यातील अवैध वाळू वाहतुक रोखण्यासाठी पथक तयार केले होते. रविवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास हे पथक खासगी वाहनाने अमळनेर तालुक्यातील पातोंडा व दहिवद शिवारात गस्त घालीत होते. यावेळी पथकाला नांद्री गावाकडून दहिवद गावाकडे वाळूने भरलेले ट्रॅक्टर येतांना दिसले. पथकाने ट्रॅक्टरवर कारवाईसाठी थांबवले असता, चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला. पथकातील तलाठी हे ट्रॅक्टवर चढलेले असतांना (एमएच १९ डीएम ०५२८) व (एमएच २१ बी २९९२) क्रमांकाच्या दुचाकीवरुन भूषण उर्फ सोनू राजेंद्र देवरे रा. पातोंडा व ट्रॅक्टवरील चालक योगेश पाटील तर दुसऱ्या दुचाकीवर दोन अज्ञात इसम आले. ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न दुचाकीवरुन आलेल्या वाळूमाफियांनी ट्रॅक्टवर चढलेल्या तलाठी यांनाखाली ओढले आणि त्यांनालाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर तलाठी संदीप पाटील यांना खाली आडवे पाडून मारहाण करीत असतांना आज याला जीवंत सोडायचे नाही
असे म्हणून योगेश पाटील याने ट्रॅक्टरने तलाठी यांना चिरडण्याचा प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!