मोबाईलवर बोलणे महागात पडेल!
एसटीचालकांना महामंडळाचा निलंबनाचा इशारा; अपघात टाळण्यासाठी निर्णय..

0

24 प्राईम न्यूज 21 2023 राज्याच्या कानाकोपऱ्यात प्रवाशांना सुरक्षित इच्छित स्थळी पोहोचवण्याची जबाबदारी एसटीचे चालक पार पाडतात. मात्र काही चालक गाडी चालवताना मोबाईलवर

बोलणं, हेडफोन कानात घालून गाणी ऐकणे असे प्रकार घडले आहेत. यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी यापुढे एसटी चालवताना मोबाईलवर बोलताना, हेडफोन लावून गाणी ऐकताना निदर्शनास आले तर संबंधित चालकाला थेट निलंबित करण्यात येईल, असा इशारा एसटी महामंडळाने दिला आहे.

एसटी महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार गाड्या असून ६० इलेक्ट्रिक गाड्या आहेत. या गाड्याच्या माध्यमातून दररोज ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. सुरक्षित प्रवास म्हणूनप्रवासी एसटीच्या गाड्यांना पसंती देतात. मात्र गाडी चालवताना काही चालक मोबाईलवर बोलणं हेडफोन लावून गाणी ऐकतात, समाज माध्यमांतून, लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळे एसटी बस चालवत असताना मोबाईलवरबोलणे अथवा हेडफोन घालून भ्रमणध्वनीवरील गाणी, व्हिडीओ
ऐकणे, बघणे अशी चालकाची
एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर प्रचलित नियमानुसार कडककार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!